Bharti Singh-Haarsh Limbachiyaa Announce Pregnancy: भारती सिंग होणार 'आई'; ‘Hum Maa Banne Wale Hai’ या खास व्हिडिओ द्वारा चाहत्यांसोबत शेअर केली गूडन्यूज
Bharti Singh and Haarsh Limbachiyaa (Photo Credits: YouTube Stills)

कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी नुकतीच चाहत्यांना खूषखबर दिली आहे. ही जोडी त्यांच्या आयुष्यात पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. युट्युब व्हिडिओ वर त्यांनी खास व्हिडिओ करत या गोड बातमीची माहिती दिली आहे. युट्युब वर 'हम मा बनने वाले है' अशा टायटल खाली तिने व्हिडिओ बनवला आहे.

भारती सिंग बाथरूम मध्ये प्रेगनंसी टेस्ट करत असल्याच्या व्हिडिओ 'LOL Life Of Limbachiyaa's' या युट्युब चॅनेल वर शेअर केला आहे. यामध्ये मागील 6 महिन्यांपासून टेस्ट करत आहे. हा आनंदाचा क्षण तिला मिस करायचा नसल्याने कॅमेरा ऑन ठेवत असल्याचं तिने म्हटलं आहे. या वेळेस जेव्हा तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.  हे देखील पहा: Dance Deewane 3 च्या सेटवर एका स्पर्धकासाठी Bharti Singh आणि Nora Fatehi एकमेकींना भिडल्या, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट.

 पहा भारती सिंगची गूडन्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

ईटी टाईम्स सोबत बोलताना भारतीने एप्रिलच्या शेवटापर्यंत किंवा मे महिन्याच्या सुरूवातीला बाळाचं आगमन होईल असं म्हटलं आहे. नुकताच या जोडप्याने दुबई मध्ये त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. 3 डिसेंबर 2017 मध्ये हर्ष आणि भारती गोवा मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मागील काही आठवड्यांपासून भारती आई होणार असल्याच्या बातम्यांची चर्चा होती पण तेव्हा भारतीने थेट उत्तर टाळत वेळ आल्यावर आनंदाची बातमी नक्की शेअर करेन असं म्हटलं होतं.