भारतीय बेस्ट महिला कॉमेडियन स्टार भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया Haarsh Limbachiyaa) यांचे ड्रग्ज प्रकरण काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजले. त्यानंतर सोशल मिडियापासून थोी लांब असणा-या भारतीने आज खास पोस्ट केली आहे. आज तिच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिने हे खास पोस्ट केले असून आपले लग्नातील फोटो शेअर केले आहेत. मुख्य म्हणजे या पोस्टच्या माध्यमातून तिने आपला पती हर्ष लिंबाचिया याला देखील रोमँटिक अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी मोजक्या शब्दात प्रेमाचे महत्व सांगून तिने आपल्या पतीला हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहे.
भारतीने या पोस्ट मध्ये आपल्या लग्नाचे फोटो शेअर करुन 'प्रेम म्हणजे ते नाही ज्यात आपण किती दिवस, किती महिने किंवा किती दिवस एकत्र राहिलो. प्रेम म्हणजे आपण प्रत्येक दिवस एकमेकांवर किती प्रेम करतो ते आहे.' असा सुंदर संदेश देत आपला पती हर्षला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- Bharti Singh Instagram Post: ड्रग्ज प्रकरणानंतर कॉमेडियन भारती सिंह हिने पती हर्ष लिंबाचियाचा उल्लेख करत केली 'ही' भावूक पोस्ट
पाहा पोस्ट:
View this post on Instagram
तर हर्षनेही आपल्या लग्नाचा फोटो शेअर करुन चांगले लग्न ते आहे जे त्याला चांगले बनवते आणि बनवत राहते असे त्या फोटोखाली कॅप्शन लिहिले आहे.
View this post on Instagram
भारती आणि हर्षचे लग्न 2017 साली गोव्यात झाले होते. या दोघांचे लग्न टिव्ही विश्वातील एक बिग फॅट वेडिंग होते. तिच्या लग्नात अनेक टीव्ही कलाकार, बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या लग्नसमारंभात संगीत, हळदी, पूल पार्टी, रिसेप्शन समारंभ असे अनेक कार्यक्रम पार पडले होते.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी आणि कार्यालयावर काही दिवसांपूर्वी NCB ने घातलेला छापा, समन्स, अटक आणि जामिनावर त्यांची झालेली सुटका या सर्व घटना एकापाठोपाठ एक घडत गेल्या. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भारती सिंह सोशल मिडियावर थोडी लांबच होती. मात्र 1 डिसेंबरला तिने इन्स्टाग्राम झालेल्या प्रकाराबाबत एक पोस्ट करत आपल्या पतीने दिलेली साथ किती महत्त्वाची आहे सांगणारे एक पोस्ट केले.