Kaun Banega Crorepati 14 Promo: अमिताभ बच्चन पुन्हा येणार 'हॉट सीट'वर, जाणून घ्या कोणत्या दिवसापासून होणार  रजिस्ट्रेशन
Kaun Banega Crorepati 14 (PC - Instagram)

Kaun Banega Crorepati 14 Promo: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोच्या क्रेझचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या 14 वर्षांपासून हा शो सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या अप्रतिम खेळाने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

अमिताभ बच्चन पुन्हा हा शो घेऊन येत आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन (Sony Entertainment Television) ने शनिवारी सोशल मीडियावर नवीन सीझनचा पहिला प्रोमो (KBC 14 Promo) रिलीज करून ही आनंदाची बातमी आपल्या दर्शकांसोबत शेअर केली आहे. या शोचे आतापर्यंत 13 सीझन झाले आहेत आणि आता 14व्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणीची तारीखही समोर आली आहे. (हेही वाचा - The Kapil Sharma Show होणार बंद? कपिल शर्मामुळे निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय)

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील पती-पत्नीपासून सुरू होणाऱ्या या शोचा प्रोमो सोनी टीव्हीने रिलीज केला आहे. नवरा बायकोला सांगतो, 'अगं शांता, पहा ती सकाळी लवकर येईल, जेव्हा मी तुझ्यासाठी इमारत बांधेल आणि आपली मुलं परदेशी विद्यापीठात शिकायला जातील. आपण स्वित्झर्लंडला जाऊ'. हे ऐकून बायको म्हणते जा खोटे बोलता. यानंतर प्रोमोमध्ये वेळ लॅप्स दाखवला आहे आणि नवरा-बायको दोघेही म्हातारे झाले आहेत. पुन्हा नवरा बायकोला हेचं स्पप्न दाखवतो.

पती-पत्नीमधील या संवादानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज येतो आणि ते म्हणतात, 'स्वप्न पाहून आनंदी होऊ नका, ती पूर्णही करा. जर तुम्हाला या शोमध्ये नोंदणी करायची असेल तर 9 एप्रिलला तयार व्हा आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा गेम शो खेळा. सोनी टीव्हीने जारी केलेल्या या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये 'नोंदणी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचा प्रवास 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता, फक्त सोनी टीव्हीवर सुरू होईल' असे लिहिले आहे.