Kaun Banega Crorepati 12 Registration: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' च्या 12 व्या सीजनची नुकतीच घोषणा केली. शनिवारी सोनी टीव्हीने (Sony TV) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या व्हिडिओद्वारे KBC 12 व्या सीजनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसची माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ आपल्या घरुनच शूट केला आहे. हा व्हिडिओ सोनी टीव्हीने आपल्या ऑफिशियल चॅनलवर रिलिज करत हॉटसीटपर्यंत पोहण्याची संधी कशी मिळवाल याची माहिती दिली आहे.
KBC12 साठी रजिस्ट्रेशन कसे कराल?
KBC 12 ची रजिस्ट्रेशन प्रोसेस 9 मे पासून रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर सुरु होणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यंदा लॉकडाऊनमुळे या ऑडिशन्स डिजिटल होतील, अशी माहिती समोर येत आहे. KBC 12 मध्ये सहभागी होण्याची प्रक्रीया चार टप्प्यात होणार आहे. रजिस्ट्रेशन, स्क्रिनिंग, ऑनलाईन ऑडिशन्स आणि पर्सनल इंटरव्ह्यू.
पहा व्हिडिओ:
Har cheez ko break lag sakta hai par sapnon ko break nahee lag sakta hai. Aapke sapnon ko udaan dene phir aa rahe hain @Srbachchan lekar #KBC12. Registrations shuru honge 9 May raat 9 baje se sirf Sony TV par. pic.twitter.com/1XmZ9QNtm2
— sonytv (@SonyTV) May 2, 2020
या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन गंमतीशीररित्या प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन म्हणतात की, "कोविड 19 लॉकडाऊनमुळे शाळा, शॉपिंग मॉल्स, जीम्स इत्यादी गोष्टी ठप्प आहेत आणि संपूर्ण जग काहीसं थांबलं आहे. मात्र तुमच्या स्वप्नांवर कोणीही लॉकडाऊन लावू शकत नाही. म्हणूनच तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी केबीसी 12 येत आहे."