Ajunahi Barsat Ahe Promo: मुक्ता बर्वे - उमेश कामत पुन्हा छोट्या पडद्यावर; 'अजूनही बरसात आहे' मालिकेतून रसिकांच्या भेटीला  येणार
Ajunahi Barsat Ahe । Photo Credits: Instagram/ Mukta Barve

कोरोना संकटाचं ग्रहण मनोरंजन क्षेत्रालाही असताना सध्या रसिकांना चित्रपट, नाटकं यापासून लांब रहावं लागत आहे पण न्यू नॉर्मल स्वीकारत आता टेलिव्हजन क्षेत्र सुरू आहे. त्यामुळे ऐरवी सिनेमा आणि नाटकांमधून रसिकांच्या भेटीला येणारे दोन मोठे चेहरे म्हणजे उमेश कामत (Umesh Kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) हे आता छोट्या पडद्यावरून पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'अजूनही बरसात आहे' (Ajunahi Barsat Ahe) या त्यांच्या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी रिलेशनशीप मध्ये असलेली दोघं एका वधू-वर सूचक मंडळाच्या कार्यालयाच्या जवळ भेटतात असे पहिल्या प्रोमोत पहायला मिळत आहे. त्यामुळे ही देखील रोमॅन्टिक स्टोरीवर बेतलेली मालिका असेल असं दिसतय.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुक्ताने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये नव्या प्रोजेक्ट बाबतचे संकेत दिले होते. अखेर आता यावरून पडदा उठला आहे. 'अजूनही बरसात आहे' ही नवी मालिका 12 जुलै पासून सोनी मराठीवर रसिकांच्या भेटीला येणार आहे. Kon Honaar Crorepati 2021 देखील रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

अजूनही बरसात आहे प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत या दोन्ही कलाकारांनी छोटा पडदा देखील गाजवला आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत मुक्ताला तुफान प्रतिसाद मिळाला होता. तर उमेश कामत देखील वादळवाट, असंभव, शुभं करोति, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत सुपरहीट ठरला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते टेलिव्हिजन क्षेत्रापासून दूर होते त्यामुळे नव्या मालिकेतून मुक्ता आणि उमेशची जोडी रसिकांच्या भेटीला येणार असल्याने सारेच खूप उत्सुक आहेत.