कोण होणार करोडपती मराठी (Kon Honaar Crorepati) च्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या पर्वामध्ये अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचा पहिला पहिला प्रोमो करतच स्पर्धकांना रजिस्ट्रेशनचे पर्याय आणि तारखा देखील जाहीर करण्यात आले आहेत. कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना 24 मार्च ते 2 एप्रिल 2021 दरम्यान नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. अद्याप हा शो कधीपासून टेलिकास्ट होणार हे सांगण्यात आले नसले तरीही रसिकांसाठी रजिस्ट्रेशनच्या लाईन्स खुल्या होत आहे.
कोण होणार करोडपती रजिस्ट्रेशन
कोण होणार करोडपती मराठी हा रिएलिटी शो सोनी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना सोनी लिव्ह अॅप वर किंवा 8080044222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन रजिस्ट्रेशन अर्थात नाव नोंदणी करता येणार आहे.
पहा प्रोमो
View this post on Instagram
कोण होणार करोडपती या रिएलिटी गेम शो ची जगभरात क्रेझ आहे. हा शो तब्बल 120 देशांमध्ये होतो. तसेच केवळ भारतामध्ये 10 विविध भाषांमध्ये त्यांचे आयोजन केले जाते. बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि केबीसी हे भारतामध्ये जणू समीकरणच बनलेले आहे. मराठी कोण होणार करोडपती हा शो यापूर्वी सचिन खेडेकर यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते स्वप्नील जोशी यांनी देखील होस्ट केला आहे.