Actor Pearl Puri याच्या अटकेनंतर Ekta Kapoor हिने सोशल मिडियावर पोस्ट करुन संपूर्ण घटनेबाबत दिली 'ही' धक्कादायक माहिती
Pearl Puri and Ekta Kapoor (Photo Credits: Instagram)

निर्माता एकता कपूर (Ekta Kapoor) हिची लोकप्रिय हिंदी मालिका नागिन 3 मधील अभिनेता पर्ल पुरी (Pearl Puri) याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केल्याची बातमी वा-यासारखी पसरली. ही बातमी व्हायरल होताच त्याचे कलाकार मित्रपरिवाराने तो निर्दोष असल्याचे सांगत त्याला सपोर्ट करत आहे. यात करिष्मा तन्ना, अली गोनी, राखी सावंत, अनिता हसनंदानी यांसारख्या अनेक स्टार्सने तो निर्दोष असल्याचे सांगितले. दरम्यान एकता कपूर हिने पर्ल पुरी निर्दोष बाजू मांडत एक धक्कादायक खुलासा केला आहे. पीडित मुलीचे आई-वडिल यांच्यातील वैवाहिक वादात पर्ल पुरी ओढले गेले असल्याचे तिने सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.

एकता कपूर म्हणते, "आपण जे काल रात्री पाहिले जे माणुसकीला धरून नव्हतं. मी कधी बाल शोषण वा छेडछाड करणा-या व्यक्तिचे समर्थन करु शकते का?" असा सवाल तिने चाहत्यांना विचारला आहे.हेदेखील वाचा- Actor Pearl Puri Arrested: टीव्ही अभिनेता पर्ल पुरी याला मुंबई पोलिसांकडून अटक

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

'वैवाहिक वादात तिस-या व्यक्तीला का ओढले जात आहे?' असं एकता कपूर म्हणाली. "पीडितेच्या आईने मला सांगितले होते की, पीडितेचे वडिल आपल्या मुलीचा ताबा मिळविण्याच्या लढाईत वेगवेगळ्या कहाण्या बनविण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरुन हे सिद्ध होईल की, सेटवर काम करणारी पीडितेची आई आपल्या मुलीची नीट सांभाळ करू शकत नाही. हे खूप चुकीचे आहे." असंही ती पुढे म्हणाली.

त्यानंतर एकताने 'मी टू' चळवळीबाबत भाष्य केले. "एक अजेंडा पर्यंत पोहोचविण्यासाठी खूपच गंभीर आंदोलनाचा वापर केला जात आहे. आणि या संपूर्ण घटनेत एक अल्पवयीन मुलीला मानसिकरित्या तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एका निर्दोष व्यक्तिला दोषी ठरवले जात आहे." असंही ती पुढे म्हणाली.

तसेच एकता कपूर हिच्याकडे पिडीतेच्या आईचे सर्व व्हॉईस नोट्स असून ज्यात ती पर्ल निर्दोष आहे असं म्हणाली आहे. मी टूसारख्या चळवळीचा गैरवापर केला जात आहे असही ती पुढे म्हणाली.