सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिला आदित्य नारायण याने ऑनसेट घातली लग्नाची मागणी; पाहा व्हायरल व्हिडिओ
Neha Kakkar (Photo Credits: Twitter)

अवघ्या तरुणाईने आपल्या आवाजाची भुरळ पाडणारी सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या सोनी वाहिनीवरील 'इंडियन आयडॉल 11' (Indian Idol 11) ची परीक्षकाची धुरा सांभाळताना दिसत आहे. नेहा जितकी तिच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध झाली तितकीच ती तिच्या अफेअर आणि ब्रेकअपमुळे चर्चेत आली. ब्रेकअप नंतर आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणी अजूनही तिच्या मनात घर करुन आहेत तिच्या चाहत्यांना अनेक कार्यक्रमांमधून, मुलाखतींमधून पाहायला मिळाले. याची पुन्हा एकदा प्रचिती पाहायाला मिळाली ती इंडियन आयडॉल 11 च्या सेटवर. एका स्पर्धकाने गायलेल्या गाण्यामुळे नेहाला आपल्या एक्सची आठवण झाली आणि ती ऑनसेट खूप भावूक झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ही संधी साधून तेथील निवेदक म्हणून असलेल्या आदित्य नारायण (Aditya Narayan) ने तिला चक्क लग्नाची मागणी घातली. हा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये इंडियन आयडॉलमधील एका स्पर्धकाने ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ‘चन्ना मेरेया’ गाणं गायलं होतं. गाणं ऐकल्यावर नेहाला तिच्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण आली आणि तिनं भावूक होऊन त्याच्यासाठी हे गाणं गायलं.याच संधीचा फायदा घेत आदित्य नारायण याने तिला ऑनसेट तिला लग्नाची मागणी घातली.

पाहूया काय होती यावर नेहाची प्रतिक्रिया:

हेदेखील वाचा- 'Indian Idol 11' च्या ऑडिशनमध्ये गायिका नेहा कक्कड ला पाहून स्पर्धकाचा तोल घसरला, केले असे काही की परीक्षक ही झाले अवाक्

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इतकच नव्हे तर नेहाचे गाणे संपल्यावर होस्ट आदित्य नारायण तिची मस्करी करत म्हणाला, यानंतर मला फक्त एवढंच सांगायचं आहे. ‘इसमे तेरा घाटा, इनका कुछ नही जाता’असे म्हटले आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये एकच हशा पिकलेला या व्हिडिओत दिसत आहे. नेहाही या वेळी तिच्या बिनधास्त मूडमध्ये दिसली. तिनेही हा सर्व मस्करीचा भाग समजून खूप स्पोर्टिंगली घेतले.