
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) जाणे हे सर्वांनाच चटका लावून गेले. अगदी अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अजूनही सिद्धार्थचे चाहते शोकात आहेत. इंडस्ट्रीमधील लोक अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. आता भजन सम्राट अनुप जलोटासोबत बिग बॉस 12 मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री जसलीन मथारू (Jasleen Matharu) रुग्णालयात दाखल आहे. जसलीनने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सांगत आहे की सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर बसलेल्या धक्क्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले.
जसलीन मथारूने सोमवारी, 6 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ शेअर केला, ज्याद्वारे तिने तिच्या चाहत्यांना सांगितले की तिची तब्येत ठीक नाही व म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जसलीन मथारूने तिच्या चाहत्यांना सांगितले की, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांची व शेहनाजची भेट घेतल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जसलीनच्यामते, सिद्धार्थच्या अकाली मृत्यूमुळे तिला फार मोठा धक्का बसला आहे व त्याचा खूप नकारात्मक परिणाम तिच्यावर झाला आहे.
View this post on Instagram
जसलीन म्हणते की, ‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या घटनेने इतकी हादरली आहे. मला असे वाटले की जीवनाची शाश्वती नाही. त्यानंतर काय झाले माहित नाही. मला रुग्णालयात दाखल करावे लागले. काल संध्याकाळी मला 104 अंश ताप होता. आता थोडी सुधारणा आहे. स्वतःची काळजी घ्या, आणि प्रार्थना करा की मी लवकर बरी होईन.’ (हेही वाचा: Mumbai: अंधेरी येथे दारु पिऊन चालणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्याच्या कारची धडक, पोलिसांकडून गुन्हा दाखल)
दरम्यान, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी एक निवेदन प्रसिद्ध केले ज्यात त्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी लोकांना विनंती केली आहे की, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. याशिवाय सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांचेही आभार मानले आहेत. गुरुवारी (2 सप्टेंबर) अभिनेत्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले गेले. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीवर आणि अभिनेत्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.