Mumbai: अंधेरी येथे दारु पिऊन चालणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्याच्या कारची धडक, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

Mumbai: मुंबईतील अंधेरी येथे रस्त्यावरुन दारु पिऊन चालणाऱ्या एका व्यक्तीला कारची धडक बसल्याने त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. ज्या कारने व्यक्तीला धडक दिली ती कार बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi)  याची असल्याचे सांगण्यात आले आहे. धडक बसलेल्या व्यक्तीचे नाव राजेश बौद्ध असे आहे. या प्ररकरणी डीएन नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचसोबत एफआयआरची प्रक्रिया सुरु असून अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही.

डीएन नगर पोलिसांच्या मते, ही घटना संध्याकाळी 6.30 वाजता घडली आहे. ज्यावेळी बेदी हा त्याच्या घराच्या दिशेने जात होता. तर बौद्ध हा रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक तो कारचा समोर आला. बेदी याने ब्रेक मारण्यापूर्वीच त्याच्या कारने बौद्ध याला धडक दिली होती. कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता बेदी याने तातडीने पीडित व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.(Sidharth Shukla, Pratyusha Banerjee आणि Surekha Sikri टेलिव्हिजन वरील Balika Vadhu मालिकेतील या तिन्ही कलाकारांनी घेतला जगाचा निरोप)

Tweet:

बौद्ध याला सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल केल्यानंतर बेदी याने पोलिसात धाव घेतली. त्याच्या विरोधात अपघात आणि वेगाने वाहन चालवत असल्याचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या सुत्रांनी असे सांगितले की, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तेव्हा त्यात बौद्ध याची चुक असल्याचे दिसून आले. बौद्ध हा अपघाताच्या वेळी खुप दारु प्यायला होता. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांन पुढे म्हटले आहे.