
Actor Mohit-Addite Malik Blessed With Baby Boy: टीव्ही कलाकार मोहित मलिक (Mohit Malik) आणि आदिति मलिक (Addite Malik) या दाम्पत्यांना आज पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. सोशल मिडियाद्वारे त्यांनी आपण आई-बाबा झाल्याची बातमी दिली आहे. पिता झाल्याची बातमी देत मोहितने सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे आणि शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि आशीर्वादबाबत तुमचे मन:पूर्वक आभार असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोहित आणि त्याची पत्नी आपले अनेक फोटोज सोशल मिडियावर पोस्ट करत होते.
आदितीने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात ती आपल्या तान्हुल्याला हातात घेऊन उभी आहे. हा फोटो शेअर करुन "डियर युनिवर्स, या आशीर्वादासाठी धन्यवाद! मध्यरात्री लहान बाळाच्या आवाजाने सगळं दणाणून गेले. त्या आवाजासाठी धन्यवाद. आमच्या सुंदरशा जगात छोट्या मुलाच्या येण्याने आम्ही स्वत:ला भाग्यशाली समजत आहोत. तो इथे आहे आणि हे खूप जादुई दुनियेसारखे आहे. आम्ही दोनाचे तीन झालो आहोत आणि यापुढे नेहमी. बेबी मलिक चे माता-पिता मोहित आणि आदिती."हेदेखील वाचा- Kareena Kapoor Khan ने लेक Taimur ला COVID-19 vaccination महत्त्व पटवून कसं दिलं हे सांगताना खास व्हिडिओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश; एकदा पहाच हा व्हिडिओ
View this post on Instagram
मोहितने सुद्धा हा सुंदर फोटो शेअर केला आहे. जिथे तो आदितीसह आपल्या न्यू बोर्न बेबीसह दिसत आहे. सोशल मिडियावर हा संदेश शेअर केल्यानंतर तो त्यांना शुभेच्छांचे संदेश सुद्धा देत आहे.
याआधी आदितीने सोशल मिडियावर आपल्या बेबी बंपसह खूप फोटोज शेअर केले होते. जिथे ती मोहितसह पोज करतान दिसली.