Kareena Kapoor Khan ने लेक Taimur ला COVID-19 vaccination महत्त्व पटवून कसं दिलं हे सांगताना खास व्हिडिओ शेअर करत दिला महत्त्वाचा संदेश; एकदा पहाच हा व्हिडिओ
Taimur Ali Khan (Photo Credits: Instagram)

भारतामध्ये आता 1 मे पासून कोविड 19 लसीकरणाचा तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू होणार आहे. यासाठी नागरिकांना कोविन अ‍ॅप वर रजिस्टर करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील सार्‍यांचा यामध्ये समावेश होणार असल्याने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून नागरिकांना रजिस्ट्रेशन करा आणि लसीकरणामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान करिना कपूर खानने लसीकरण करणं का महत्त्वाचं आहे? हे तिचा 4 वर्षांचा लेक तैमुर याला कसं समजावून सांगितलं? याचा किस्सा आणि सोबत एक मह्त्त्वाचा संदेश देणारा व्हीडिओ देखील शेअर केला आहे. 'टॉम अ‍ॅन्ड जेरी' या कार्टुन कॅरेक्टर्सचा समावेश असलेली ही व्हिडिओ क्लिप आहे. यात टॉम 'कोरोना वायरस' तर जेरी व्हॅक्सिन च्या रूपात दाखवला आहे.

करिनाने व्हिडिओ शेअर करताना या कोरोना जागतिक संकटामध्ये घरात मुलं देखील घाबरलेल्या स्थितीत असल्याचं सांगितलं आहे. कॅप्शन मध्ये लिहताना तिने मुलं घरातील वडीलधार्‍यांकडूनच शिकत आहेत. आम्ही तैमुर सोबत याबाबत बोलताना प्रौढांनी लस घेणं का गरजेचे आहे हेसांगितलं आणि त्याबाबत हा व्हिडिओ बोलका आणि समजायला सोपा आहे. दरम्यान लस घेणं, रजिस्टर करणं यामध्ये आपणही संयम बागळणं गरजेचे आहे. आपल्या मदतीसाठी असलेल्या वैद्यकी कर्मचार्‍यांचा, प्रशासकीय यंत्रणेचा विचार व्हायला हवा. रजिस्ट्रेशन करा पण तुमची वेळ येईपर्यंत धीर देखील धरा. COVID-19 Vaccination For 18-44 Age Group in India: भारतात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी CoWin Portal वर आपल्या पहिल्या कोरोना लसीकरणाची नोंदणी कशी करावी?

पहा करिनाची पोस्ट

बुधवारी देखील करिना कपूरने एक इंस्टाग्राम लिहीत बेजबाबदारपणे वागणार्‍या लोकांवर संताप व्यक्त केला होता. कोविड संकटातही लोकं इतका हलगर्जी पणा कसा करू शकतात? असा तिने प्रश्न विचारला होता. चूकीच्या पद्धतीने मास्क घालण्यावरून आणि डॉक्टरांवरील मानसिक, शारिरीक ताणावरही तिने या पोस्टमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान सैफ अली खानने कोविड 19 चे दोन्ही डोस घेतले आहेत. काही महिन्यांपूर्वीच करिनाने त्यांच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने करिना, सैफ, तैमुर नवजात बाळासोबत वेळ घालवत आहेत.