अभिनेत्री मानसी साळवी (Mansi Salvi) 13 वर्षांनंतर पुन्हा मराठी टेलिव्हिजन वर आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर भुरळ पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान झी मराठीवर 'काय घडलं त्या रात्री' (Kay Ghadla Tya Ratri) या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत मानसी साळवी पोलिस अधिकार्याची भूमिका बजावत आहे. एका कलाकाराचा मृत्यू होतो आणि ती हत्या आहे की आत्महत्या अशा चर्चा रंगतात. या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागते असा मालिकेचा प्लॉट आहे. यामध्ये मानसी तडफदार पोलिस अधिकार्याच्या भूमिकेत आहे. मानसी देखील या मालिकेबाबत उत्सुक आहे. इंस्टाग्रामवर मालिकेचा प्रोमो शेअर करताना तिने #होम कमिंग असं म्हटलं आहे.
मानसी यापूर्वी सौदामिनी, नुपूर, असंभव या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती. असंभव मालिकेतील तिचं शुभ्रा चं पात्र फारच गाजलं. मात्र त्यानंतर मराठी टेलिव्हिजनपासून दुरावलेली मानसी आता पुन्हा चाहत्यांना नव्या मालिकेद्वारा येत आहे. Yeu Kashi Tashi Me Nandayla: 'येऊ कशी तशी मी नांदायला' च्या प्रोमोत दिसणारी अन्विता फलटणकर हिने रवी जाधव च्या 'ह्या' सुपरहिट चित्रपटात केली होती सहकलाकाराची भूमिका.
काय घडलं त्या रात्री चा प्रोमो
View this post on Instagram
31 डिसेंबर पासून ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. एक कणखर, निडर पोलिस अधिकारी पण वैयक्तिक आयुष्यात तितकीच प्रेमळ आई असा दुहेरी पदर तिच्या मालिकेतील पात्राला आहे. त्यामुळे अनेक वर्षांनी मराठी रसिकांना भेटायला येणारी मानसी पुन्हा काय नवं घेऊन येणार याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेत सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, जयवंत वाडकर हे कलाकार देखील दिसणार आहेत.