Aapla Marathi Bigg Boss Season 2: मराठी बिग बॉस स्पर्धक विणा जगताप विकेंडच्या डावात भडकली,सहकारी सदस्यांवर केला जोरदार हल्लाबोल
Veena Jagtap | (Photo credit: Instagram)

Aapla Marathi Bigg Boss Season 2: अल्पावधीतच तुफान टीआरपीच्या रडारवर पोहोचलेल्या बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात दरदिवशी काही न काही पंगा होताना दिसून येत आहे. या सीजनला सुरूवात होऊन एक आठवडा जरी झाला असला तरी, या सात-आठ दिवसांमध्येच अनेक कारणांवरून वादाचे सुर घुमू लागल्याचे पाहायला मिळाले. अर्थात, बिग बॉसच्या घरात झालेल्या आठवडाभराच्या या भांडणतंट्याचा निकाल शनिवार आणि रविवारी आलेल्या विकेंडच्या डावात महेश मांजरेकर यांच्याद्वारे पार पडला. ज्यात महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सरांकडून घरातील अनेकांना तंबी देण्यात आली तर काहींचे कौतुकदेखील झाले. दरम्यान, विकेंडच्या डावात वीणा जगताप (Veena Jagtap) ही काहीशी हटके ठरली.

आतापर्यंत गुडी गुडी वाटणारी आणि सोज्वळ 'राधा' म्ह्णून ओळखली जाणाऱ्या वीणा जगताप ही अभिजित बिचुकले यांच्यानंतर बऱ्यापैकी लक्षवेधी ठरली. बिग बॉसच्या घरात गेली सात दिवस सुरु असलेल्या कुटुंबकलहामुळे विणाने सहकारी सदस्यांवर जोरदार हल्लाबोल केला. हा हल्लाबोल करताना विणाने अभिजित बिचुकले, माधव देवचक्के, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे यांना सडेतोड बोल सुनावले. या आठवड्यात स्टार परफॉर्मन्स ठरलेल्या चार सदस्यांमध्ये निवड झालेल्या वीणाने या चौघांविषयी स्वतःचे स्पष्ट मत मांडले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 2nd June 2019, Weekend चा डाव Updates: जाणून घ्या कोण आहे घरातील 'विषारी नागीण', तर महेश मांजेरकरांनी कोणाचा घेतला खरपूस समाचार)

अभिजित बिचुकले यांना सतत टार्गेट करणाऱ्या, आणि बोल लावणाऱ्या व्यक्तींकडेच बिचुकले जाऊन गेम प्लॅन डिस्कस करतात, असा आरोप तिने त्यांच्यावर लावला. शिवाय घरात सतत आरडाओरड करत क्लेष वाढवणाऱ्या आपल्या महिला सदस्यांवरही ती बरसली. एकंदरीत सर्व सदस्यांसोबत विकेंडच्या डावासाठी काऊचवर बसलेली वीणा जणू काही स्वतःच सर्वांचा निकाल लावत असल्याची झलकही पाहायला मिळाली.

बिग बॉस सिजन 2 मधीळ बिग बॉसच्या घरातील शांत सदस्यांपैकी एक अशीच काहीशी विणाची ओळख बणली होती. तिच्या या शांतपणामुळे सोशल नेटवर्किंग साईटवर देखील ती ट्रोल होताना दिसून येत होती. मात्र, आठवड्याभराची सर्व भडास तिने विकेंडच्या डावात भरून काढण्याचा प्रयत्न केल्याने, आपणही गप्प बसणाऱ्यांतील नाही, हे दाखवण्याचा विणाने पुरेपूर प्रयत्न केला.