Bigg Boss Marathi 2, Episode 8 Highlights: बिग बॉसच्या कालच्या भागापासून वीकएंडच्या डावाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात सदस्यांनी घरात घातलेला कल्ला, भांडणे, वापरलेले शब्द यांबद्दल महेश मांजरेकर त्यांचा समाचार घेत आहेत. सर्वात आधी शिवानी आणि बिचुकले यांचा समेट घडवून ते किचन मध्ये घडलेल्या खिचडी भांडणावर बोलतात. या दरम्यान वीणा बिचुकले यांच्यावर त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या बाजूवर चिडते. शिवानी नेहमीच बिचुकले यांच्याविरुद्ध बोलत असते, तरी बिचुकले तिचीच साथ देतात याचा राग ती व्यक्त करते.
त्यानंतर घरात खेळले जाणारे टास्क सर्वांना समजले का असे विचारले जाते, यावर शिवने जे काही उत्तर देतो यावरून त्याचे या घरातील भविष्य किती दिवसांचे असेल ते लक्षात येते. सुरुवातीला शिव लंबी रेस का घोडा वाटला होता, मात्र असे घडणार नाही. दरम्यान शिवला शिवानीला प्रपोज करायला सांगितले जाते, आणि इथे शिव पूर्णपणे माती खातो. नंतर सध्या घरात चालू असलेल्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी एका प्रेक्षकाला पाचारण करण्यात येते. हा प्रेक्षक शिवानीला 'विषारी नागिणी'ची उपमा देऊन तिला नागीण डान्स करण्याची शिक्षा देते. तर नेहाला आगाऊ म्हटले जाते.
नंतर घरातील सदस्यांना त्यांची त्यांच्या मागे कोण कोण चुगली करते ते सांगितले जाते. यामध्ये माधव बद्दल केळकर चुगली करत आहे, किशोरी बद्दलही केळकरचे नाव येते. नेहाबद्दल पराग जे 'कुत्र्याची शेपूट' हे बोलला होता ते नेहाला सांगितले जाते. पुढे शिवला शिवानी आणि विना त्याच्याविरोधात कट रचल असल्याचे सांगितले जाते. या दरम्यान माधव वीणाने त्याला 'लहान पपी' म्हणाल्याचे आवडले नसल्याचे सांगतो. इथे परत वीणा माधव कसा चुकीचा आहे आणि तो कसा सर्दोन लोक बोलत असताना मुद्दाम तिथे जाऊन त्यांच्या गोष्टी ऐकतो त्याबद्दल बोलते.
शेवटी एलीमेशन सुरु होते. इथे सर्वांची उत्सुकता ताणून, सर्वांना टेंशन देऊन या आठवड्यात कोणीच बाहेर जाणार नसल्याचे सांगितले जाते.