Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेतील अभिनेता मंदार चंदवाडकर काही दिवासापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. शोच्या सेटवर 110 लोकांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी 4 कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. निर्माता असित मोदी यांनी 15 दिवसांच्या लॉकडाउनचा शूट आणि शोवर कसा परिणाम होईल? यासंदर्भात आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला सांगितलं आहे.
निर्माता असित मोदी यांनी सांगितलं की, मार्गदर्शक सूचनांनुसार आम्हाला सेटवर प्रत्येकाची आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी लागली. त्यानंतर आम्ही सर्व लोकांच्या चाचण्या घेतल्या आणि यात 4 जण पॉझिटिव्ह आले. परंतु, आम्ही त्यांना आधीच होम क्वारेन्टाईन केले होते. (वाचा - Ram Kapoor's Father Anil Kapoor Dies: राम कपूर यांचे वडील अनिल कपूर यांचे कर्करोगामुळे निधन; अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट)
कोरोना चाचणी करतानाचं आम्हाला सेटवरील काहीजणांमध्ये लक्षणं जाणवत होते. आम्ही शुक्रवारी प्रत्येकाची चाचणी केली. यात चार जण कोरोना संक्रमित असल्याचं समजलं. सध्या हे चारही जण होम क्वारंटाईन आहेत. यात काही अभिनेते तर काही प्रॉडक्शनच्या लोकांचा समावेश आहे. परंतु, सेटवरील उर्वरित जणांची चाचणी निगेटिव्ह आहे. बाकी सर्वजण सुरक्षित आहेत, असंही असित मोदी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यात गुरुवारी 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 53,335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 2959056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 62,0060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे.