Love Hostel Trailer: 'लव्ह हॉस्टेल'चा ट्रेलर रिलीज, पहिल्यांदाच खतरनाक अंदाजात दिसले Vikrant Massey; पहा व्हिडिओ
Love Hostel Trailer (PC - You Tube)

Love Hostel Trailer: विक्रांत मॅसी (Vikrant Massey), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर चित्रपट लव्ह हॉस्टेल (Love Hostel) चा शानदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात विक्रांत आणि सान्या एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. या दोघांनी गुपचूप लग्न केलं. पण नंतर घरातील लोक त्यांच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटात बॉबी देओल चित्रपटात खतरनाक खलनायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा ऑनर किलिंगवर आधारित आहे.

या थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमण यांनी केले आहे. शाहरुख खानच्या प्रॉडक्शन रेड चिलीजच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 25 फेब्रुवारीला झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. (वाचा - Rudra Edge Of Darkness: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला रिलीज होणार अजय देवगणची पहिली वेब सीरिज 'रुद्र', पाहा नवा ट्रेलर)

हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, जो उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. बॉबी देओल जवळपास 2 वर्षांनी या चित्रपटात दिसणार आहे. याआधी 'आश्रम' या वेबसिरीजमधील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. या चित्रपटात तो रागीट लूकमध्ये असून नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटात विक्रांत मॅसी आशु नावाच्या तरुणाची तर सान्या मल्होत्रा ​​ज्योतीची भूमिका साकारत आहे. घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याची भूमिका ते दोघे करत आहेत. त्याचे कुटुंबीय त्याच्या मागे लागतात. बॉबी देओलने ट्रेलरमध्ये प्रवेश करताच ते अधिक रोमांचक होते. त्याच्या पात्राचे नाव डागर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

हा ट्रेलर बॉबी देओलने शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'प्रेमात पडणे ही आशु आणि ज्योतीची निवड होती, त्यांचे नशीब लिहिणे माझ्या हातात आहे. लव्ह हॉस्टेलचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या व्हॅलेंटाईन डेला डागर तुम्हाला प्रेमाने घाबरवेल. लव्ह हॉस्टेल 25 फेब्रुवारीपासून ZEE5 वर स्ट्रीम होईल.'