Kangana Ranaut Film Tejas First Look: 'पंगा' (Panga) सिनेमात कबड्डीपटूच्या भूमिकेनंतर अजून एका दमदार भूमिकेतून अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे. लवकरच कंगना रनौत भारतीय वायूसेनेच्या पायलटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोंनी स्क्रूवाला (Ronnie Screwala) यांचा आगामी सिनेमा 'तेजस' (Tejas) यात ती आयएएफ पायलट या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील कंगनाचा फर्स्ट लूक निर्मात्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात कंगना अत्यंत दमदार दिसत आहे. (कंगना रनौत च्या जवळच्या व्यक्तीवर झाला होता अॅसिड हल्ला; ट्विटच्या माध्यमातून 'छपाक' टीमचे मानले विशेष आभार)
"आकाशात उंच उडणारा.. तेजस सिनेमातील कंगना रनौतचा फर्स्ट लूक सादर करत आहोत.." असे लिहित निर्मात्यांनी तेजस सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे.
RSVP Movies ट्विट:
Soaring high into the sky!
Presenting the first look of #KanganaRanaut as an Air force Pilot in #Tejas. ✈️@KanganaTeam @RonnieScrewvala #SarveshMewara @nonabains pic.twitter.com/vZzpD8pllw
— RSVP Movies (@RSVPMovies) February 17, 2020
हातात हेल्मेट, डोळ्यांवर गॉगल आणि फायटर प्लेन समोर आयएएफ युनिफार्म मध्ये उभी असलेली कंगना सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळत आहे. ('धाकड़' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, अॅक्शन मोड मध्ये दिसणार कंगना रनौत)
या सिनेमातून महिला देशासाठी देत असलेले योगदान प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन सर्वेश मेहता यांनी केले असून हा सिनेमा एप्रिल 2021 मध्ये प्रदर्शित होईल. सध्या कंगना रनौत तिच्या 'थलाइवी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.