कंगना रनौत च्या जवळच्या व्यक्तीवर झाला होता अॅसिड हल्ला; ट्विटच्या माध्यमातून 'छपाक' टीमचे मानले विशेष आभार
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

दीपिका पादुकोण हिचा आगामी चित्रपट 'छपाक' (Chhapaak) सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटात लक्ष्मी अगरवाल झालेल्या अॅसिड हल्ल्याची घटना दाखविण्यात आली आहे. मात्र हाच अॅसिड हल्ला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या जवळच्या व्यक्तीसोबत झाला आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून तिची बहिण रंगोली (Rangoli) आहे. दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि मेघना गुलजार (Meghna Gulzar) हा विषय लोकांसमोर आणत असल्याने कंगनाने त्यांचे ट्विटच्या माध्यमातून विशेष आभार मानले आहेत. या विषयाने आपल्या बहिणीसोबत झालेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावर तिने केलेली मात ही नेहमी मला प्रेरणादायी राहिल असेही तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःखाशी लढण्याची हिंमत देते.'

पाहा कंगना चा व्हिडिओ:

हा विषय निवडल्याबद्दल मी दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार यांचे विशेष आभार मानते. आज या सिनेमामुळे त्या प्रत्येक चेहऱ्यावर हसू असेल ज्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन या मुलींचा चेहरा खराब केला होता. आशा करते की या नव्या वर्षात अ‍ॅसिड विक्रीवर बंदी यावी ज्यामुळे आपला देश अ‍ॅसिड हल्ल्यापासून मुक्त होऊ शकेल.’असेही ती म्हणाली.

या हल्ल्याविषयी बोलत असताना रंगोली म्हणाली की "मी त्या मुलाच्या प्रपोजलला नकार दिल्यावर त्यानं एक लीटर अ‍ॅसिड माझ्या चेहऱ्यावर उडवलं. मला 54 सर्जरी कराव्या लागल्या. आणि त्याच वेळी माझी बहीण कंगनाला काही कारण नसताना अक्षरशः जीवघेणी मारहाण करण्यात आली", असं रंगोलीने लिहिलं आहे.