Dhakkad Poster (Photo Credits: Twitter)

कंगना रनौत (Kanagna Ranaut) सध्या आपला आगामी चित्रपट 'जजमेंटल है क्या' च्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे. राजकुमार राव आणि कंगना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. याचदरम्यान कंगनाच्या आणखी एका चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. 'धाकड़' (Dhaakad) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातला कंगनाचा अॅक्शन लूकमधील पोस्टर खूपच चर्चेचा विषय बनलाय.

या पोस्टरमध्ये कंगना आपल्या दोन्ही हातांमध्ये बंदूक घेऊन फायरिंग करताना दिसत आहे. तिच्या डोळ्यात खूप राग, द्वेष दिसत आहे.या पोस्टर ला प्रेक्षकांकडून वाहवा मिळत आहे.

अलीकडेच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. ज्यात आगीच्या ज्वालांमध्ये हातात बंदूक घेतलेला कंगनाचा मागून काढलेला फोटो दिसत होता. या पोस्टरला ही प्रेक्षकांनी खूप पसंत केले. रजनीश 'राजी' घई हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून चिंतन गांधी आणि रिनिश रविंद्र यांनी लिहिले आहे.

हेही वाचा- Judgementall Hai Kya 'Wakhara' Song: कंगना रनौत आणि राजकुमार राव चा आतापर्यंतचा सर्वात हटके असा 'वखरा स्वॅग' एकदा पाहाच, Watch Video

या चित्रपटाची शूटिंग भारता व्यतिरिक्त साउथ ईस्ट एशिा, मिडल ईस्ट आणि युरोप मध्ये झाली आहे. दिवाळी 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.