Judgementall Hai Kya 'Wakhara' Song: कंगना रनौत आणि राजकुमार राव चा आतापर्यंतचा सर्वात हटके असा 'वखरा स्वॅग' एकदा पाहाच, Watch Video
Wakhara Song in Judgementall Hai kya (Photo Credits: YouTube)

चित्रपटाच्या नावावरुन वादाच्या भोव-यात अडकलेला 'जजमेंटल है क्या' (Judgementall Hai Kya) या चित्रपटाचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'Wakhara Swag' असे गाण्याचे बोल असून कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) पंजाबी स्वॅग करताना दिसत आहेत. या गाण्यात स्वॅग लूकमध्ये खूपच अफलातून दिसत आहेत. नुकताच झी म्युजिक च्या युट्यूब पेजवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

हे गाणे नव इंदर, लिसा मिश्रा आणि राजा कुमारी यांनी गायले असून तनिष्क बाग्ची या गाण्याचे संगीतकार आहे. पाहा या अफलातून गाण्याचा व्हिडिओ-

हा गाण्यामध्ये कंगना रनौत आणि राजकुमार राव चा लूक खूपच भन्नाट दिसत असून या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळेल. एकता कपूरच्या 'बालाजी टेलिफिल्म लिमिटेड' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून प्रकाश कोवेलमुडीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

हेही वाचा- 'Judgementall Hai Kya' Official Trailer: वेडेपणाच्या सोंगाआड मर्डर मिस्ट्री सांगणारा कंगना आणि राजकुमारचा 'Judgementall Hai Kya' चा ट्रेलर प्रदर्शित

नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करुन प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेली कंगना या चित्रपटातही एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. तिला तोडीस तोड म्हणून राजकुमार राव ही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.