कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा (Coronavirus Lockdown) सर्वाधिक परिणाम गरीबांवर होत असतो. त्यांचे अगदी अन्नापासून जीवनावश्यक सर्वच गरजांपासून वंचित राहतात. आर्थिक चणचण निर्माण होते. अशावेळी समाजातील अनेक घटक अशा गरजू-गरीब व्यक्तींच्या मदतीला धावून आले आहेत. बालिवूड कलाकारांनी या लढ्यात आपआपल्या परीने योगदान दिले. यात आता अजून एका बॉलिवूड सेलिब्रिटीची भर पडली आहे. त्या सेलिब्रिटीचे नाव आहे अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone). सनी लियोन आणि तिचा पती डेनियल वेबर (Daniel Weber) यांनी देखील गरजूंना मदत केली. आज त्यांनी गरजूंना अन्नदान केले. ट्रॅकमधून फूड पॅकेट्स वाटतानाचे त्या दोघांचे फोटोज समोर आले आहेत.
सध्याच्या कठीण काळात प्रत्येक लहान सहान मदत महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे सनी आणि डेनियल यांची मदत कौतुकास्पद आहे. पहा सनी आणि डेनियलचे अन्नदान करतानाचे फोटोज... (Shero Teaser: सनी लियोनी ने शेअर केला आपल्या आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर 'शीरो' चित्रपटाचा टीझर; पहा व्हिडिओ)
पहा फोटोज:
गरीब-गरजूंना मदत करण्याचा सनीचा हा पहिलाच प्रयत्न नाही. मागील वर्षी देखील सनीने NGO सोबत 1000 स्थलांतरित मजूरांची मदत केली होती. तसंच त्यांच्या जेवणाची सोय देखील केली होती. दरम्यान, सध्या सनी 'Shero' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर असून या सिनेमाचे दिग्दर्शन सृजित विजयन करत आहेत. हा सिनेमा तामिळ, हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.