Shero Teaser: सनी लियोनी ने शेअर केला आपल्या आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर 'शीरो' चित्रपटाचा टीझर; पहा व्हिडिओ
Shero Teaser (Photo Credit - Instagram)

Shero Teaser: बोल्ड अवतार, उत्तम नृत्य आणि क्यूट अंदाजाने सर्वांची मने जिंकणारी सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सनी लिओनी बर्‍याचदा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातचं आता सनी लिओनीने तिच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती शेअर केली आहे. सनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सायकोलॉजिकल थ्रिलर 'शीरो' (Shero) चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला आत्तापर्यंत जवळपास पाच लाखाहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

सनी लिओनीचा हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 'शीरो' हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सनी पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 'शीरो'चा टीझर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, हा हॉरर चित्रपट असणार आहे. टीझरमध्ये सनी जखमी झालेली पाहायला मिळत आहे. त्याचवेळी, एक मुलगा पायर्‍यावर बसलेला दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर असा अंदाज वर्तविला जात आहे की, हा चित्रपट बर्‍यापैकी थ्रिलर असेल. (वाचा - Ram Charan ने वाढदिवसानिमित्त शेअर केला RRR चित्रपटातील खास लूक; पहा फोटो)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनीने टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या चित्रपटाचा भाग झाल्यावर मी खूप उत्साही आहे. हा चित्रपट साइकोलॉजिकल थ्रिलर असून तमिळ, हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.' मात्र अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सनीच्या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला असून चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.