Subhedar Trailer Out: बहुप्रतिक्षित सुभेदार चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांनी केला कंमेटचा वर्षाव
Subhedar | You Tube

Subhedar Trailer Out: बहुप्रतिक्षित  सुभेदार (Subhedar)  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भरपूर उस्तुकता होती. ट्रेलर रिलीज होताच हजारो लाखो व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहून चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची कथा दाखवण्यात येणार आहे. सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये "आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं..." हा डायलॉग ऐकू येतो. ट्रेलर मधील या डायलॉगने प्रेक्षकांचे मन वळवून घेतले आहे. 18 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.