Malika Rajput | Instagram

गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूत (Malika Rajput) तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली आहे. उत्तर प्रदेशच्या  सुलतानपूर येथील घरात विजय लक्ष्मी (Vijay Lakshmi) उर्फ मल्लिकाने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. अद्याप मल्लिकाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांकडून मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. सध्या तो पोस्ट मार्टमसाठी पाठवून पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी मल्लिकाच्या मृत्यूचं कारण पोस्ट पार्टम अहवालामध्येच स्पष्ट होईल असं सांगितलं आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार मल्लिकाची आई सुमित्रा सिंह यांनी मल्लिका रात्री नेहमीप्रमाणे घरी आली. तिने दरवाजा आतून बंद केला. घरात 3 जण होते पण दरवाजा उघडू शकत नव्हते. खोलीमध्ये लाईट सुरूच होती. एकाने खिडकीतून पाहिले असता ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. मल्लिका वाचवण्यासाठी धावाधाव करण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला होता. Vetri Duraisamy Death: तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा अपघाती मृत्यू,चित्रपट क्षेत्रात खळबळ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malika Rajput (@mallikarajput)

मल्लिकाने अभिनेत्री कंगना रनौत सोबत रिव्हॉल्वर रानी या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत काम केलं आहे. गायक शान याच्या यारा तुझे या म्युझिक अल्बममधून मल्लिका प्रकाशझोतात आली. मल्लिकाने अनेक अल्बम आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. कलाक्षेत्राप्रमाणे ती राजकारणातही होती. मात्र 2018 मध्ये ती राजकारणातून बाहेर पडली होती.