Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी फसवणूकीविरोधात पोलिसात दाखल केली तक्रार
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

गेल्या काही आठवड्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) पोर्नोग्राफीच्या व्हिडिओंमुळे (Pornography video) चर्चेत आहेत. आता शिल्पा शेट्टीच्या आईने (Sunanda Shetty) पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा राज कुंद्रा किंवा शिल्पाशी काही संबंध नाही. शिल्पाची आई (Shilpa's mother) सुनंदा यांनी ही जमीन असलेल्या फसवणूकीबद्दल तक्रार दिली आहे. सुनंदा शेट्टी यांनी सुधाकर घारे (Sudhakar Ghare) विरोधात जहू पोलिस ठाण्यात (Jahu Police Station) फिर्याद दिली आहे. ही तक्रार कर्जत (Karjat) जिल्हा रायगड येथील संबंधित आहे.

सुनंदा यांनी पोलिसांना सांगितले आहे की त्यांनी सुधाकर यांच्याशी कर्जत येथून 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत जमीन करार केला होता. त्यावेळी त्यांनी ही जमीन आपली असल्याचे सांगून बनावट कागदपत्रांच्या मदतीने सुनंदा यांना  1 कोटी 60 लाखांना विकली होती. थोड्या वेळाने जेव्हा सुनंदा ,यांना सत्य कळले तेव्हा त्यांना सुधाकर यांना याबद्दल विचारले. सुधाकर म्हणाले की ते एका नेत्याच्या जवळचे आहेत. तसेच कोर्टात जाण्यास सांगितले. यानंतर सुनंदा कोर्टात गेल्या. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कलम 406, 409, 420, 462, 467, 468, 471, आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा गेल्या काही आठवड्यांपासून पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. राज कुंद्रा यांच्यावर असे व्हिडीओ बनवून त्यांचा अ‍ॅपद्वारे प्रकाशित केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर शिल्पाही अशा कामात सामील असल्याची माहिती पोलिसांकडे नाही. राज कुंद्रा यांना पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला दोनदा पोलीस कोठडी दिली. त्याचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळण्यात आला. आता राज कुंद्रा 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे.