गायिका Shareya Ghoshal झाली आई, गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट
Shreya Ghoshal give birth to baby boy (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील उत्तम प्लेबॅक सिंग श्रेया घोषाल (Shareya Ghoshal) आई झाली आहे. कारण तिच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. श्रेया हिने आज इंस्टाग्राम अकाउंटवर ही खुशखबर शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने असे म्हटले आहे की, आज दुपारी तिने एका लहान गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिचा नवरा शिलादित्य मुखोपाध्याय आणि परिवारात खुप आनंदाचे वातावरण आहे. त्याचसोबत चाहत्यांनी दिलेल्या आशीर्वादासाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत.(Shreya Ghoshal होणार आई! Baby Bump फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत शेअर केली गूडन्यूज)

कोरोनाचा काळात श्रेयाने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. तर श्रेया आणि तिचा मुलगा पूर्णपणे सुखरुप आहे. लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. एप्रिल महिन्यात ओटभरण सुद्धा पूर्ण धुमधडाक्यात आणि चालीरितीने पार पडले. याचे शानदार फोटो सुद्धा समोर आले होते. खासियत अशी की, हे ओटभरण वर्च्युअल पद्धतीने पार पडले. ज्यामध्ये नातेवाईकांना व्हिडिओमध्ये जोडण्यात आले होते. श्रेया हिची ही आयडिया खुप जणांच्या पसंदीस पडली होती आणि तिचे कौतुक सुद्धा सोशल मीडियात करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

श्रेया घोषाल हिचा 5 वर्षांपूर्वी विवाह आपला लहानपणीचा मित्र शिलादित्य मुखोपाध्याय याच्यासोबत झाला. त्यांचा हा विवाहसोहळा पूर्णपणे बंगाली परंपरेनुसार पार पडला होता. लग्नापूर्वी दोघे एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या 5 वर्षानंतर श्रेया हिला मुलगा झाल्यानंतर अत्यंत आनंद व्यक्त केला जात आहे. या वर्षात मार्च महिन्याच्या सुरुवातीला  तिने चाहत्यांसोबत ती आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर केली होती.