Shreya Ghoshal होणार आई! Baby Bump फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत शेअर केली गूडन्यूज
Shreya Ghoshal| Photo Credits: Instagram

गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हीने आज (4 मार्च) इंस्टाग्रामवर पोस्ट करत लवकरच आई होणार असल्याची गूडन्यूज तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान श्रेया घोषाल हीने तिच्या बाळासाठी आशिर्वाद आणि प्रार्थना करण्याची मागणी देखील केली आहे. हे श्रेयाचं पहिलं बाळ असून तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करत तिच्या प्रेगनन्सीची माहिती दिली आहे.

2015 साली गायिका श्रेया घोषाल शैलादित्य मुखोपाध्याय सोबत  विवाहबंधनात अडकली होती. हे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले आहे. आता दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी उत्सुक आहे. Singer Harshdeep Kaur Blessed with Baby Boy: बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर हिने दिला गोंडस मुलाला जन्म, सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दिली ही आनंदाची बातमी.

श्रेया घोषालची इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

श्रेया घोषाल ही बॉलिवूडप्रमाणेच अनेक भारतीय भाषेमध्येदेखील तिच्या पार्श्वगायनामुळे लोकप्रिय आहे. सैराट, जोगवा सारख्या मराठी सिनेमातील अनेक गाण्यांना श्रेयाचा आवाज लाभला आहे. दरम्यान श्रेयाने आज तिच्या प्रेगनन्सीची माहिती देताना बेबी श्रेयादित्य चं लवकरच आगमन होणार आहे. आमच्या आयुष्यातील नव्या चॅप्टरसाठी आम्ही सज्ज होत असताना तुमच्या प्रार्थनेची आम्हांलागरज असल्याचं देखील तिने म्हटलं आहे.