Singer Harshdeep Kaur Blessed with Baby Boy: बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका हर्षदीप कौर हिने दिला गोंडस मुलाला जन्म, सोशल मिडियाद्वारे चाहत्यांना दिली ही आनंदाची बातमी
Harshdeep-Kaur Blessed with a Baby Boy (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये एकाहून एक सुपरहिट गाणी देणारी गायिका हर्षदीप कौर (Singer Hasrshdeep Kaur) आणि तिचे पती मनकीत सिंह (Mankeet Singh) यांच्या घरी एका तान्हुल्याचे आगमन झाले आहे. हर्षदीप कौरने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मिडियाद्वारे तिने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. 'कतियां करूं', 'हीर', 'जालिमा' आणि 'कबीरा' यांसारखी अनेक हिट गाणी हर्षदीपच्या नावे कोरली आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन तिने ही आनंदाची बातमी दिली. गायिकेने आपल्या पतीसह एक सुंदर फोटो शेअर करुन ही बातमी दिली.

हर्षदीप ने हा फोटो शेअर करुन, "स्वर्गातून एक छोटसं बाळ धरतीवर आलं आहे आणि त्याने आम्हाला आई-वडील बनवले आहे. आमचा ज्यूनियर 'सिंह' आलेला आहे. आम्ही खूप खूश आहोत." असे लिहिले आहे.हेदेखील वाचा- Kareena Kapoor Khan च्या नव्या चिमुकल्याची पहिली झलक आली समोर; तैमुर, सैफ सह हॉस्पिटल मधून घरी परतली (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshdeep Kaur (@harshdeepkaurmusic)

हर्षदीपचे पती मनकीत सिंह यांनी देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे आणि आपल्या पत्नीसोबतचा हर्षदीपसोबतचा फोटो शेअर केला आहे. हर्षदीप कौर हिने 2015 मध्ये आपले बालपणीचा मित्र मनकित सिंह याच्याशी पारंपारिक रिती-परंपरानुसार लग्न केले होते.