प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) लवकरच आई होण्याच्या (Mom to Be) उंबरठ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मिडिया अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली होती. सध्या विकेंड लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाची राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता श्रेयाच्या मैत्रिणीवर डिजिटल माध्यमातून तिच्यासाठी खास सरप्राईज डोहाळ जेवण (Baby Shower) आयोजित केले होते. श्रेयाने या डोहाळ जेवणाचे फोटोज सोशल मिडियावर शेअर आहेत. ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून तिच्या मैत्रिणींनी हे डोहाळ जेवण केले. आपल्या मैत्रिणींनी दिलेले हे सरप्राईज पाहून श्रेया देखील आनंदून गेली.
श्रेया घोषालने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या डोहाळ जेवणाचे फोटोज शेअर केले आहेत. "लांब सूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या ‘बावरीज' कडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळेजेवण…प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवलं. खूप मज्जा आली, खेळही खेळले. मी किती लकी आहे!" असे कॅप्शन श्रेया घोषालने या फोटोजला दिले आहेत.हेदेखील वाचा- Oh Sanam Song Released: श्रेया घोषाल आणि टोनी कक्कर यांचे रोमँटिक गाणे 'ओ सनम' रिलीज; पहा व्हिडिओ
View this post on Instagram
श्रेयाच्या मैत्रिणींनी तिच्या डोहाळ जेवणासाठी खास तिच्यासाठी बनवलेले पदार्थही तिला पाठवले होते. हे सर्व पाहून श्रेयाला सुखद धक्का मिळाला हे या फोटोजमधून दिसत आहे. मार्च महिन्यात श्रेयाने आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती.
"ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान भावना आहे. मी आयुष्यातल्या सर्वात सुंदर काळात आहेत. खरंच हा देवाचा चमत्कार आहे." असे सांगत तिने सोशल मिडियावरून आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. नुकतेच श्रेया आणि गायक टोनी कक्कड़ यांचे 'ओ सनम' गाणे प्रदर्शित झाले असून ते युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.