
Oh Sanam Song Released: चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) तिच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत एक नव्हे तर बरीच सुपरहिट गाणी दिली आहेत. दरम्यान, आता श्रेया घोषाल पुन्हा एकदा तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेचं श्रेयाने गायक टोनी कक्कर (Tony Kakkar) यांच्यासह आपले नवीन गाणे यूट्यूबवर प्रसिद्ध केले आहे. या गाण्याचे बोल 'ओ सनम' असे आहेत. त्यांचे हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. त्याचवेळी श्रेया आणि टोनीची जोडी यूट्यूबवर प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस पडली आहे. सध्या हे गाणे चाहत्यांकडून सोशल मीडियावर प्रचंड शेअर केलं जात आहे.
गायिका श्रेया घोषाल आणि टोनी कक्कर यांचे 'ओ सनम' हे गाणे म्युझिक फॅक्टरीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केले आहे. संगीत प्रेमी या गाण्याचे खूप कौतुक करीत आहेत. हे एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्यात टोनी कक्कर आणि अभिनेत्री हिबा नवाब अभिनय करताना दिसत आहेत. हे एक प्रेमगीत आहे. आतापर्यंत सुमारे 4 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 2 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. (वाचा - Aishwarya Rai नंतर Karisma Kapoor सारख्या दिसणाऱ्या तरुणीचे Photos आणि Videos सोशल मीडियावर व्हायरल; हुबेहुब अभिनेत्रीची कार्बन कॉपी आहे 'ही' महिला)
दरम्यान, हे गाणं पाहिल्यानंतर टोनी कक्कर आणि श्रेया घोषाल यांचे फॅन्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजर्संने प्रतिक्रिया देताना "एक अप्रतिम जोडी," असं म्हटलं आहे. तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिलं, "हेबा आणि टोनी यांची जोडी शोभून दिसत आहे." त्याचवेळी आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं आहे, "श्रेया नेहमीचं उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते."
टोनी कक्कर च्या नुकत्याचं रिलीज झालेल्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा 'तेरा सूट' म्युझिक व्हिडिओ नुकताचं प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्याबरोबर जसमीन भसीन देखील दिसली होती. या नवीन गाण्यात अली गोनी आणि जसमीन भसीन लुप्पा-चुप्पी खेळताना दिसले होते. त्याचवेळी टोनी कक्कड़ यांचे आणखी एक 'बूटी शेक' गाणे यापूर्वी प्रसिद्ध झाले. या गाण्यात हंसिका मोटवानी दिसली होती.