Aishwarya Rai नंतर Karisma Kapoor सारख्या दिसणाऱ्या तरुणीचे Photos आणि Videos सोशल मीडियावर व्हायरल; हुबेहुब अभिनेत्रीची कार्बन कॉपी आहे 'ही' महिला
करिश्मा कपूर सारखी दिसणारी महिला (Photo Credits: Instagram)

Karisma Kapoor Doppleganger Heena Photos and Videos: बॉलिवूड सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या अनेक व्यक्तींची फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. त्याचा लूक आणि व्यक्तिमत्व सर्वांनाचं चकित करते. ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ नंतर आता करिश्मा कपूरसारख्या (Karisma Kapoor) दिसणाऱ्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. 'Heenaakh1' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिसणारी महिला पूर्णपणे करिश्मा कपूरसारखी दिसत आहे.

हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर आपले अनेक मजेदार फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती पूर्णपणे करिश्मासारखी दिसत आहे. तिने तिचे अनेक टिकटॉक व्हिडिओही शेअर केले आहेत. ज्यात तिचा लुक, व्यक्तिमत्व, अंदाद आणि एक्सप्रेशन करिश्मासारखे दिसत आहेत. (वाचा - Sunny Leone सारख्या दिसणाऱ्या Aaveera Singh ची सोशल मीडियावर धूम; पहा Photos)

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

हिनाने करिश्माच्या चित्रपटाच्या संवादांपासून ते तिच्या हिट गाण्यापर्यंतचे स्वतःचे लिप सिंक व्हिडिओही तयार केले आहेत, जे आतापर्यंत बऱ्याचं लोकांनी पाहिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Heenaakh1 (@heenaakh1)

दरम्यान, करिश्मा कपूरबद्दल बोलायचं झालं तर, तिने नुकतेच 8 वर्षानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ती अल्ट बालाजी आणि झी 5 च्या शो 'मेंटलहुड' मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या शोमध्ये ती संजय सुरी, दिनो मोरया, संध्या मृदुल, शिल्पा शुक्ला, तिल्लोतामा शोम आणि श्रुती शेठसोबतही दिसली होती.