Sunny Leone सारख्या दिसणाऱ्या Aaveera Singh ची सोशल मीडियावर धूम; पहा Photos
Sunny Leone & Aaveera Singh (Photo Credits: Instagram)

Sunny Leone Lookalike Aaveera Singh Photos: बॉलिवूड अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या मुलींची सोशल मीडियावर चर्चा असते. ऐश्वर्या राय बच्चन, कैटरीना कैफ यांच्यासह अनेक अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या मुली समोर आल्या आहेत. त्यात आता अजून एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सनी लियोन (Sunny Leone). सनी लियोन सारख्या दिसणाऱ्या या मॉडेलची सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चा आहे.

आवीरा सिंह मैसन असे या मॉडलचे नाव असून तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आवीराचे लूक्स, पर्सनालिटी सनी लियोनशी मिळती जुळती आहे. सोशल मीडियावर तिच्या लुक्सच्या बऱ्याच चर्चा आहेत. अलिकडेच मिका सिंहचा म्युझिक व्हिडिओ 'ग्लासियां' मध्ये ती झळकली होती.

पहा फोटोज:

या म्युझिक व्हिडिओसाठी सनी लियोनच्या तारखा न मिळाल्याने आवीराला यात संधी देण्यात आली, अशी माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी ने दिली आहे.

आवीरा सिंह पंजाबी मॉडल आणि अभिनेत्री आहे. ती पंजाब फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिचा जन्म 19 जानेवारी 1992 मध्ये पंजाबी कुटुंबात झाला असून तिने डी.ए.व्ही पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

आवीराला लहानपणापासूनच मॉडलिंग आणि अभिनयाची आवड होती. 2016 मध्ये राजवीर जवंदाचे सुपरहिट गाणे शानदार मधून चर्चेत आली होती. त्यानंतर तिने हनी सिद्धू च्या 'सिग्नेचर' मध्ये काम केले होते.