'मी पाकिस्तानी संघाची आई नाहीये', वीणा मलिक हिच्या ट्वीटला सानिया मिर्झा हिने दिले सडेतोड उत्तर
सानिया मिर्झा आणि वीणा मलिक (फोटो सौजन्य-Instagram)

भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) संघाचा आईसीसी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup) चा सामना दोन दिवसांपूर्वी खेळवण्यात आला. या सामन्यात नेहमीच प्रमाणे पाकिस्तानी संघाचा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटच्या चाहत्यांकडून संघातील खेळाडूंबद्दल विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) यांचा सामन्याच्या आदल्या दिवशी रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत सानिया आणि शोएब मँनचेस्टरमधील एका प्रसिद्ध शीशा पार्लर मध्ये दिसून आले आहेत. या प्रकारवरुन पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने ट्वीटवरुन सानिया हिच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच सानिया हिने सुद्धा वीणा हिने ट्वीटकरुन बोललेल्या गोष्टीवर सडेतोड उत्तर दिले आहे.

वीणा मलिक हिने तिच्या ट्वीटमध्ये सानिया हिला प्रश्न विचारत असे म्हटले आहे की, सानिया तुझ्या मुलाबद्दल मला चिंता वाटत आहे. तुम्ही तुमच्या मुलाला शीशा पार्लर मध्ये कसे घेऊन जाऊ शकता? तसेच मुलाच्या आरोग्यासाठी हुक्का हानिकारक आहे. त्याचसोबत आर्चिज जंक फूड असल्याचे मानले जाते. जे एथलीट आणि मुलांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे तुला ही गोष्ट माहिती पाहिजे. त्याचसोबत तु एका मुलाच्या आईसह एक उत्तम खेळाडूसुद्धा आहेस.

मात्र सानिया हिला वीणाने विचारलेल्या प्रश्नावरुन खुपच राग आल्याने तिने सुद्धा ट्वीट केले आहे. या ट्वीट मध्ये वीणा हिला सानियाने तिच्यावर केलेल्या टीकेचे उत्तर देत असे म्हटले आहे की, मी माझ्या मुलाला घेऊन शीशा पार्लरमध्ये घेऊन गेली नव्हती. त्यामुळे तुला माझी आणि या जगाची काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण मी माझ्या मुलाची इतरांच्या दृष्टीपेक्षा अधिक उत्तम काळजी घेते. दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे मी पाकिस्तान संघाची डायटिशन नाही, त्यांची आई नाही किंवा एखादी मुख्याध्यापिकासह शिक्षसुद्धा नाही आहे. मात्र तुला माझ्याबद्दल वाटलेल्या काळजीसाठी धन्यवाद असे सानिया हिने म्हटले आहे. (IND vs PAK, CWC 2019: क्रिकेट सामन्यापूर्वी सानिया मिर्झा पाकिस्तान संघासोबत पार्टी करताना दिसली,नेटकऱ्यांकडून टीका Video)

त्याचसोबत सानिया हिने ज्या लोकांनी तिचा व्हिडिओ चोरून काढला आहे त्यांच्यावर सुद्धा राग व्यक्त केला. त्यामध्ये सानिया आणि शोएब एका हुक्का पार्टीचा भाग असल्याचे दिसून आले होते.