
युट्युबर आणि कॉन्टेट क्रिएटर Ranveer Allahbadia आता पुन्हा पॉडकास्ट सुरू करणार आहे. 'India's Got Latent' show च्या वादानंतर चर्चेत आलेल्या रणवीर वर अनेकांनी टीका केली होती मात्र तो पुन्हा नव्याने शो सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. 'The Ranveer Show,' चे पहिल्याप्रमाणे 4 एपिसोड येणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. 30 मार्चला एक खास व्हिडिओ पोस्ट करून त्याने ही माहिती दिली आहे.
काय म्हणाला Ranveer Allahbadia
View this post on Instagram
Ranveer Allahbadia ने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामध्ये आपल्याला केवळ यश आपल्यासोबत चालणार नाही अपयशालाही सामोरं जावं लागणार याची जाणीव झाल्याचं तो म्हणाला आहे. पण या कठीण काळामध्येही ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार. अनेक हितचिंतकांच्या प्रेमातून मी पुन्हा पॉडकास्टिंग सुरू करत असल्याचं तो म्हणाला आहे. लहान मुलं देखील माझा शो पाहत आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा वापर करताना माझ्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीचं मला भान ठेवायला शिकवलं आहे. ते या पुढे मी सांभाळणार रणवीर म्हणाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला पॉडकास्ट पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर, भविष्यातील कंटेंट सभ्यता आणि नैतिकतेच्या मानकांचे पालन करेल याची खात्री करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांसह, अलाहबादिया यांनी कंटेंट निर्मितीकडे वळला आहे. समय रैनाच्या यूट्यूब शोमधील वक्तव्याबद्दल रणवीर अलाहाबादियाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे लेखी माफी सादर केली आहे.