बोल्ड आणि बिनधास्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. वादग्रस्त विधाने आणि अधून मधून पब्लिश होणारे व्हिडीओ यांमुळे राखी नेहमीच प्रकाशझोतात राहत असते. नुकतेच राखीने एक व्हिडीओ पब्लिश केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या शरीराचा एक महत्वाचा अवयव डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये राखी जे लोक आपले अवयव डोनेट करतात त्यांच्या कृत्याबद्दल अतिशय भारावलेली दिसून येते. अशा लोकांपासून प्रेरणा घेऊन राखीलासुद्धा स्वतःच्या शरीराचा एक महत्वाचा अवयव डोनेट करायचा आहे. राखीच्यामते तिच्याकडे फक्त एकच असा महत्वाचा अवयव आहे जो ती दान करू शकते. सध्या हा अवयव कोणाला डोनेट करायचा आहे याबाबतीत ती सांशक असली तरी, कोणा ना कोणालातरी नक्कीच या अवयवाचा फायदा होईल अशी आशा राखीने व्यक्त केली आहे
आता राखी नक्की कोणता अवयव दान करायला निघाली आहे, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना? हा व्हिडीओ पाहा आणि स्वतः जाणून घ्या.
काही दिवसांपूर्वी राखीने बिग बॉसमधील अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंडबद्दलही एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये राखीने अनुप जलोटा यांना स्वतःची गर्लफ्रेंड कशी टिकवून ठेवायची याबाबत सल्ले दिले होते.