अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याचा आरोप प्राजक्ता विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सुनावणीसाठी प्राजक्ता न्यायालयात हजर राहिली नसल्याने, तिच्याविरुद्ध हे वॉरंट जरी करण्यात आलं आहे.
प्राजक्ता माळी हिच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात 5 एप्रिल 2019 रोजी जान्हवी मनचंदा हिने एनसी दाखल केली होती. प्राजक्ताने तिला मारहाण व शिवीगाळ केली असल्याचे आरोप जान्हवीने प्राजक्तावर केले होते. इतकंच नव्हे तर मनचंदा यांनी नंतर ठाणे न्यायालयात धाव घेत प्राजक्ताविरुद्ध तक्रार केली होती.
न्यायालयाने तक्रार दाखल केली आणि प्राजक्ताला समन्स बजावत २६ जून रोजी न्यायालयात सुनावणीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले होते.मात्र पोलीस घरी पोहोचले तेव्हा प्राजक्ताच्या घरी कोणीच नव्हते.
दरम्यान, प्राजक्ताच्या या प्रकरणावर जून महिन्यात सुनावणी होणार होती, परंतु प्राजक्ता सुनावणीच्या दिवशी कोर्टात हजर राहिलीच नसल्याने जान्हवी मनचंदा यांचे वकील पवार यांनी प्राजक्ता विरुद्ध अटक वॉरंट काढण्याची विनंती कोर्टापुढे केली होती. परंतु न्यायालयाने तूर्तास वॉरंट काढले नसले तरी पुन्हा एकदा प्राजक्ताला समन्स पाठवण्यात येणार आहे. पण याही वेळी जर ती न्यायालयात हजर राहिली नाही तर मात्र प्राजक्ताला मोठ्या अडचणीला सामोरे जाऊ शकते. तिच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निखळ हास्य आणि मादक अदा यांचे मिश्रण असलेला नेहा पेंडसे चा Hot फोटो तुम्ही पाहिलात का?
मात्र प्राजक्ताने या आधी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "‘जान्हवीने व्हायरल केलेले फोटो आणि वॉट्सऍप चॅटचे स्क्रिनशॉट खोटे आहेत. ती माझी फॅशन डिझायनर होती आणि कपड्यांवरून माझं तिच्याशी मतभेद झाले होते. पण तिला मी मारहाण केली नाही. तिच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असं काही घडलं असतं तर सेटवरील लोकांनासुद्धा कळलं असतं."