Saaho Film Poster (Photo Credits: Twitter)

बाहुबली (Baahubali) स्टार प्रभास (Prabhas) याचा आगामी चित्रपट साहो (Saaho) उद्या (30 ऑगस्ट) रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच साहो चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाल्यापासून प्रभास याच्या चाहत्यांना त्याचा याची उत्सुकता लागून राहिली होती. तत्पूर्वी एका सिनेमागृहाबाहेर साहो चित्रपटाचा बॅनर लावत असलेल्या प्रभासच्या एका चाहत्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

लोकल रिपोर्ट्सनुसार, तेलंगना (Telangana) मधील महबूबनगर येथे राहणारा प्रभासचा चाहता लोकल सिनेमागृहाबाहेर चित्रपटाचे बॅनर लावत होता. त्याचवेळी इलेक्ट्रिक वायरसोबत त्या बॅनरचा संपर्क आल्याने त्याला विजेचा धक्का लागत तो खाली कोसळला. सिनेमागृहाच्या इमारतीवरुन खाली कोसळल्यानंतर व्यक्ती गंभीर झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपाचारासाखी दाखल करण्यात येत होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अद्याप प्रभास याला घडलेल्या घटनेबद्दल काहीच माहिती नाही . प्रभास बाबत त्याचे चाहते साहो चित्रपटाबद्दल फारच उत्सुक आहेत. तर काही चाहत्यांनी प्रभासचे होमटाउन हैदराबाद येथे 200 फिट उंच बॅनर सु्द्धा लावण्यात आला आहे.('Saaho' चित्रपटासाठी प्रभासच्या चाहत्याने आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी बनवले 200 फूट लांबीचे बॅनर)

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर सुजीत याने दिग्दर्शक केले असून प्रभास आणि श्रद्धा प्रमुख भुमिकेतून झकळणार आहेत. त्याचसोबत वामसी कृष्ण रेड्डी, प्रमोद उप्पलपति आणि भुषण कुमार यांनी प्रोड्युस केला आहे. चित्रपटाचा ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन, स्टंट आणि धमाकेदार जोडी दिसून आल्याने प्रेक्षकांच्या पसंदीस पडणार हे नक्की.