साहो (Saaho) चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा असून चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात प्रथमच अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाहुबली फेम प्रभास बॉलिवूडमध्ये जितका हिट आहे तितकाच किंबहुना त्याच्या पेक्षा जास्त टॉलिवूड मध्ये आहे. त्यामुळे तेथेही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तरुणींसह असंख्य तरुणही प्रभाससाठी वेडे आहेत. त्यातीलच आंध्रप्रदेश मधील एका चाहत्याने चक्क रस्त्यावर प्रभासचे 200 फूट लांबीचे बॅनर लावले आहे. या बॅनरचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या बॅनरमध्ये प्रभासचे साहो चित्रपटातील वेगवेगळे लूक प्रत्येकाच्या चर्चेचा विषय बनले आहेत. पाहा व्हिडिओ
350 कोटी रुपयांचा 'साहो' हा चित्रपट देशातील सर्वात मोठा अॅक्शनपट असल्याचे सांगितले जातेय. केवळ इतकच नाही तर यातील एका सीनवर 75 कोटी खर्च करण्यात आले आहे. प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही या चित्रपटात जबरदस्त अॅक्शनसीन्स केले आहेत. त्याशिवाय पहिल्यांदाच ही जोडी एकत्र येणार असून यांच्यामधील रोमान्स पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.
हेदेखील वाचा- Saaho Trailer: प्रभास-शद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
हा चित्रपट 30 ऑगस्ट संपुर्ण देशभरात प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यासह जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, एवलीन शर्मा, चंकी पांडे,मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्यासह अन्य कलाकार झळकरणार आहेत.