ऑक्सर अध्यक्ष जॉन बेली यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळ्यासाठी आमंत्रण
John Bailey (Photo Credits-Twitter)

यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळा येत्या 25-26 मे रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी ऑस्कर  (Oscar)अध्यक्ष जॉन बेली (John Bailey) यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बद्दल विनोद तावडे यांनी सांगितले आहे. भारतात प्रथमच प्रमुख पाहुणे म्हणून बेली यांची उपस्थिती लागणार आहे.

या सोहळ्यादरम्याने बेली यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहेत. तसेच अमेरिकन फीचर फिल्म एडिटर कॅरोल लिटीलटन या एडिटींग आणि सिनेमॅटोग्राफीचे वर्कशॉप्स सुद्धा होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बेली यांची भेट घेणार आहेत.(राखी सावंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; ठरली 'Best Item Dancer in Bollywood')

त्यामुळे ऑस्कर कार्यलय मुंबईत आणण्यावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच चित्रपटातील कलाकार यावेळी पुढील 50 वर्षात चित्रपटाची काय स्थिती असेल या मुद्द्यावर चर्चा करताना दिसून येतील असे सांगण्यात येत आहे. तर सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मास कम्युनिकेशन आणि मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.