बॉलिवूड अभिनेत्या सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्या इमारतीत कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Variant) रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुनील शेट्टी यांचे दक्षिण मुंबई (South Mumbai) येथील इमारत सील केली आहे. त्यानंतर संपूर्ण सिनेमा सृष्टीत एकच खळबळ माजली आहे. यासंदर्भात सुनील शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याच्या इमारतीत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णाबाबात महत्वाची माहिती दिली आहे.
सुनील शेट्टीने नुकतेच एक ट्वीट केले आहे. ज्यात त्यांने लिहले आहे की, फेक न्यूज कोणत्याही विषाणूंपेक्षा अधिक वेगात पसरते. नागरिकांनो, घाबरण्याचे कारण नाही. माझ्या इमारतीत डेल्टा व्हेरिएंट प्लस कोणताही रुग्ण आढळला नाही. केवळ एकाच रहिवासीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतर सर्वजण निगेटिव्ह आहेत आणि त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. हे देखील वाचा- नसीरुद्दीन शाह यांनी Dilip Kumar यांना मानले महान कलाकार पण सिनेमातील योगदानाबद्दल उपस्थितीत केले प्रश्न
तसेच माझी इमारत सुरक्षित आहे आणि माझा परिवारही सुखरूप आहे. इमारतीतील एका विंगला नोटीस देण्यात आले आहे. परंतु, संपूर्ण इमारत सील केली नाही. या संदर्भात चुकीची माहिती देण्यात आली आहे. माझी आई, पत्नी माना, मुलगा अहान, मुलगी अथिया आणि माझा स्टाफ यांच्यासह संपूर्ण इमारत सुरक्षित आहे.
दरम्यान, बीएमसीचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सुनील शेट्टीची इमारत सील केल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, दक्षिण मुंबईच्या अल्टामाऊंट रोड येथील पृथ्वी आपर्टमेन्ट सील करण्यात आले आहे. तसेच अभिनेता सुनील शेट्टी यांचा पूर्ण परिवार सुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.