नसीरुद्दीन शाह यांनी Dilip Kumar यांना मानले महान कलाकार पण सिनेमातील योगदानाबद्दल उपस्थितीत केले प्रश्न
दिलीप कुमार आणि नसीरुद्दीन शाह (Photo Credits-: Twitter)

गेल्याच आठवड्यात दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे नसीरुद्दीन शाह यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केले. पण आता नसीरुद्दीन यांनी त्यांच्या एका लेखात दिलीप कुमार यांच्याबद्दल अशा काही गोष्टी लिहिल्या आहेत ज्यामुळे सर्वांना आता धक्का बसला आहे. खरंतर नसीरुद्दीन यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिलेल्या एका आर्टिकलमध्ये लिहिले की, अन्य चाहत्यांप्रमाणे ते सुद्धा दिलीप कुमार यांचे फॅन होते. मात्र सिनेमातील दिलीप कुमार यांचे योगदान शून्य आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या मते, दिलीप कुमार उत्तम अभिनेते होते. त्यांना नेहमीच दुसरी लोक कॉपी करु पाहत. मात्र ते सर्वजण नक्कलच करत राहिले. दिलीप कुमार यांनी सिनेमांमध्ये उत्तम अभिनय केला पण सिनेमातील त्यांच्या योगदानाची बाब येते तेव्हा त्यांनी त्यासाठी काहीच केले नाही. ते सामाजिक कार्यात गुंतले होते.(Dilip Kumar: 'या' गंभीर आजाराने ग्रस्त होते अभिनेते दिलीप कुमार; मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला खुलासा)

नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या लेखात पुढे असे ही म्हटले की, दिलीप साहब यांनी आपल्या अनुभवाचा फायदा पुढे वाढवला नाही. 1970 च्या सुरुवातीच्या दशकानंतर येणाऱ्या कोणत्याही अभिनेत्यांसाठी जरुरी धडे सोडले नाहीत.