Dilip Kumar: 'या' गंभीर आजाराने ग्रस्त होते अभिनेते दिलीप कुमार; मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला खुलासा
दिलीप कुमार (Photo Credit: PTI)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी वयाच्या 98 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सेलेब्सपासून ते राजकारणी, खेळ विश्वातील लोकांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपले दुःख व्यक्त केले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास अडचण आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 3-4 महिन्यांत दिलीपकुमार यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

याआधी ते अनेकदा बरे होऊन घरी परत आले होते परंतु यावेळी तसे काही घडू शकले नाही. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर आज त्यांच्या डॉक्टरांनी माध्यमांसमोर खुलासा केला की, ते गंभीर आजाराने ग्रस्त होते, ज्यामुळे त्यांना बर्‍याच वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यावेळी दिलीप कुमार रूग्णालयात आले तेव्हा त्यांची तब्येत बरीच गंभीर होती आणि त्यांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, दिलीप कुमार एडवांस्ड प्रॉस्टेट कॅन्सरने (Advanced Prostate Cancer) ग्रस्त होते. हा कर्करोग शरीराच्या इतर भागातही पसरला होता. डॉक्टरांनी असेही सांगितले की, दिलीप साहेब यांच्या Pleural Cavity मध्ये पाणी झाले होते. अभिनेत्याचे मूत्रपिंडही निकामी झाले होते. यावेळी त्यांचे ब्लड ट्रांसफ्यूजन झाले परंतु त्याचाही सकारात्मक परिणाम झाला नाही. (हेही वाचा: Naseeruddin Shah यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पाहा Latest Photo)

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, ‘दिलीपकुमार अनेक महिन्यांपासून अंथरुणावर होते परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रतिसाद कमी झाला होता. त्यांच्या Pleural Cavity मधून अनेकदा द्रव बाहेर काढला होता. त्यांचा रक्तदाब कमी होत होता आणि हिमोग्लोबिनही कमी होत होता. पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, सायरा बानो यांनी घरी 10 जणांची टीम ठेवली होती, जे दिलीपकुमार यांचा घरीच उपचार करत होते, तसेच घरी मिनी आयसीयू सेटअपही होता.