Naseeruddin Shah यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पाहा Latest Photo
नसिरुद्दीन शाह, अभिनेता (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

Naseeruddin Shah Discharged from Hospital: बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाहने नुकताच सोशल मीडियावरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. नसीरुद्दीन शाह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुलगा विवान त्यांच्या सोबत होते. नसीरुद्दीन शाह यांनी रुग्णालयात योग्य उपचार घेऊन ते आता सुखरुप घरी परतले आहेत. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 29 जून रोजी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या फुफ्फुसात पॅच आढळल्याने गेला एक आठवडा त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. दरम्यान, विवानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नसीरुद्दीन यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ‘बॅक होम’, त्यांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रत्ना पाठकही दिसत आहेत. हे देखील वाचा- 5G Technology: अभिनेत्री जुही चावलाच्या अडचणींमध्ये वाढ; 1 आठवड्यामध्ये 20 लाख रुपये दंड भरण्याचा कोर्टाचा आदेश

फोटो-

महत्वाचे म्हणजे, नसीरुद्दीन शाह आणि जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना एकाच दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दिलीप कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.