Mira Rajput on Having a 3rd Child: बॉलिवूड मधील डॅशिंग अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची बायको फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत नाही आहे. पण तरीही सोशल मीडियात तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. मीरा हिचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व नेहमचीच चर्चेत असते. परंतु नुकत्याच मीरा हिने इन्स्टाग्रामवर एक Question And Answer सेशन ठेवले होते. त्यामध्ये मीराने Ask Me Anything असे म्हटले होते. त्यावेळी चाहत्यांनी तिला काही मजेशीर प्रश्न विचारल्याने तिने सुद्धा त्यांना उत्तर दिली आहेत.
या सेशन वेळी एका युजर्सने मीरा हिला असा प्रश्न विचारला की, तु तिसऱ्या मुलाचे प्लॅनिंग करत आहे का? यावर मीरा हिने उत्तर देत म्हटले की, 'हम दो हमारे दो?'(शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत सह बर्थडे सेलिब्रेशन, पहा Video)
मीरा हिने असे स्पष्ट केले आहे की, ती आणि शाहिद कपूर तिसऱ्या मुलाचे प्लॅनिंग करत नाही आहेत. त्यामुळे आम्ही दोन आणि आमचे दोन याबद्दल आम्ही खुश आहोत. तर मीरा आणि शाहिद यांनी 7 जुलै 2015 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर 26 ऑगस्ट 2016 मध्ये मीरा हिने तिची मुलगी मिशा कपूर हिला जन्म दिला होता.(शाहीद-मीराचे हे फोटोज तुम्ही पाहिलेत का ?)
मिशा नंतर 3 वर्षांनी जैन कपूर याचा जन्म झाला. अशातच एका चाहत्याने त्यांना तिसऱ्या मुलाबद्दल विचारले असता त्यावर मीरा हिने उत्तर देत सर्व तर्कवितर्कांवर पूर्णविराम लावला आहे.