बॉलिवूडमध्ये सध्या मी टूची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. त्यामुळेच आता सिंटा एक महत्तवपूर्ण निर्णय घेणार आहे.तर सिंटा एक कमिटी तयार करणार असून  त्यासाठी काही सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच या सदस्य कमिटीसाठी बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रवीना टंडन या दोघींची नावे पुढे येत आहेत.

सिंटाचे महासचिव सुशांत सिंगने बॉलिवूडमध्ये मी टूच्या मोहिमेला योग्य तो न्याय मिळावा म्हणून खूप जणांशी कमिटी प्रस्थापित करण्यासाठी चर्चा केली आहे. तर या कमिटीमध्ये अभिनेत्री रेणूका शहाणे, अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे आणि 3 पोशचे वकील हे सुद्धा या कमिटीमध्ये सामील होणार असल्याचे सुशांतने सांगितले आहे.

तर सिंटाच्या या कमिटीच्या माध्यमातून महिलांसोबत गैरव्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कडक शिक्षा देणे हा कमिटीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मी टूच्या प्रकरणे आता कमी होण्याचा अंदाज बाळगला जात आहे.