‘लक्ष्मीकांत बेर्डे’ हे नाव जरी ऐकलं तरी मराठी माणसाच्या चेहऱ्यावर हसू येतं. आपल्या अचूक कॉमेडी टायमिंग आणि अभिनयामुळे मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात आपल्या लाडक्या ‘लक्षा’चा आज वाढदिवस. आजच्याच दिवशी, म्हणजेच २६ ऑक्टोबरला लक्ष्याचा जन्म झाला होता. त्यांना जगाचा निरोप घेऊन १४ वर्ष होत असताना सुद्धा रसिक त्यांना विसरू शकले नाहीत. अशी जादू होती या हरहुन्नरी कलाकाराची. मराठी साहित्य संघात काम करणारा लक्षा नंतर लोकांच्या मनातला राजा झाला.
धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, पछाडलेला, एक होता विदुषक अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय दिसून आला. मराठी सोबत हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी आपली कमाल दाखवली. अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकुट जेव्हा एकत्र यायचे तेव्हा चित्रपट सुपरहिट होणार यात शंकाच नसायची. लक्ष्मीकांत बेर्डे यांची जादू रंगमंचावर सुद्धा दिसली. ‘टूर टूर’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘लेले विरुद्ध लेले’, ‘नांदा सौख्य भरे’ आणि अशा बऱ्याच नाटकातून सुद्धा त्यांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याच्या वाढदिवसानिम्मित पहा त्याचे गाजलेले कॉमेडी सिन्स.
धनंजय माने इथेच राहतात का?
धुमधडाका सिनेमातला हा सीन
तात्या विंचू आणि लक्षा
लक्षा आज आपल्यात नसला तरी तो मराठी माणसाच्या मनात अमर आहे. त्याचं मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीला दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे. असा नट पुन्हा होणे नाही. अशा अजरामर कलाकाराला तमाम मराठी रसिक प्रेक्षकांकडून त्रिवार अभिवादन.