सर्व लाईन व्यस्त आहेत (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

प्रत्येक व्यक्तींच्या भावना बदलण्यासाठी काही शब्दच पुरेसे पडतात अशी कथा असणारा 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या मराठी चित्रपटातचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर प्रेमसंबंध आणि लग्न तर प्रेयसी आणि बायको यांच्यामधील फरक दाखविणारा गंमतीदार असा या चित्रपटाचा टीझर आहे.

'सर्व लाईन व्यस्त आहेत' हा अमोल उतरेकर प्रस्तुत, स्टेलारिया स्टुडिओ निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल हे दिसून येणार आहेत. तसेच टीझरमधील गाण्याला आदर्श शिंदे यांनी आवाज दिला आहे. मात्र या टीझरमधील मुख्य बाब म्हणजे महेश मांजरेकर यांचे डायलॉग आणि अभिनय हे पाहण्याजोगे असणार आहेत.

या चित्रपटाची कथा ही प्रदिप मेस्री यांनी लिहीली असून 11 जानेवारी 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आयुष्यात मजा करायला शिका नाही तर सर्व लाईन व्यस्त आहेत अशी सांगण्याची वेळ येऊ देऊ नका असा संदेश या टीझरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.