Swwapnil Joshi (Photo Credits: Instagram)

मराठी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट बॉय 'स्वप्नील जोशी' (Swapnil Joshi)  याचा आज वाढदिवस. आजवर मराठी भाषेतील अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून स्वप्नील रोमँटिक हिरो म्ह्णून आपल्यासमोर आला. असं असलं तरी स्वप्नलीचे नाव घेताच अजूनही त्याने साकारलेली कृष्णाची भूमिका सर्वांच्या डोळ्यासमोर येते. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी रामानंद सागर (Ramanand Sagar)  यांच्या महाभारतावर आधारित मालिकेतून स्वप्नील प्रसिद्धीच्या झोकात आला, त्यावेळी गोंडस चेहऱ्याच्या या कृष्णाची भूमिका इतकी गाजली, की त्यानंतर सुद्धा बरीच वर्ष स्वप्नील दिसताच लोक त्याच्या पाया पडत होते. पण कृष्ण ही स्वप्नीलची पहिली भूमिका नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का? होय.. या मालिकेच्या पूर्ण चार वर्ष आधीच म्हणजे 1986 मध्येच स्वप्नीलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. रामानंद यांच्यासोबतच रामायणावर आधारित मालिकेत त्याने रामपुत्र कुश याची भूमिका साकारली होती.

आज स्वप्नील जोशी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजवर त्याने साकारलेल्या काही खास भूमिकांचा एक आढावा घेऊयात..

स्वप्नील जोशी AS कुश (हिंदी मालिका)

Swwapnil Joshi (Photo Credits: Youtube)

स्वप्नील जोशी AS कृष्ण (हिंदी मालिका)

स्वप्नील जोशी AS गौतम (मुंबई- पुणे- मुंबई)

 

View this post on Instagram

 

What a wonderful journey.... Celebrating #8YearsofMpM #Mpmforever @muktabarve @rajwadesatish Journey continues #Mpm3 #7december

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

स्वप्नील जोशी AS श्रेयस (दुनियादारी)

Swwapnil Joshi (Photo Credits: Youtube)

स्वप्नील जोशी AS श्लोक (रणांगण)

याशिवाय, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासून ते अलीकडेच जिवलगा या मालिकेतून स्वप्नीलने प्रेक्षकांची भेट घेतली होती.दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत काम करताना स्वप्नीलने आपल्या करिअरमधील काही गाजलेले चित्रपट दिले आहेत, तर सई ताम्हणकर सोबत स्वप्नीलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच हिट ठरली आहे.