'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' (Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Court) पॉक्सो न्यायालयात (Poxo Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असून, 7 फेब्रुवारीला महेश मांजरेकर यांच्याविरोधात निकाल देणार आहे. 'नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता दाखवण्यात आली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय महिला शक्ती संघाच्या वतीने सीमा देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या पॉक्सो न्यायालयात आयपीसी कलम 156(3) अन्वये गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली.
View this post on Instagram
मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटातील दृश्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. महिला आयोगाच्या वतीने तक्रार दाखल केल्यानंतर सीमा देशपांडे यांनी महेश मांजरेकर यांच्याविरोधात माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रारीकडे दुर्लक्ष करत अखेर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या पॉक्सो न्यायालयात जाऊन मांजरेकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली. (हे ही वाचा Soyrik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित "सोयरीक" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर प्रदर्शित)
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, आज प्रत्येकाचा प्रत्येक चित्रपटावर काही ना काही आक्षेप आहे. त्यामुळे आम्ही सर्व आक्षेपांचे समाधान करू शकत नाही. आम्ही आता कायदेशीर बाबींना कायदेशीर प्रतिसाद देऊ. कारण आम्ही चित्रपट बनवला आणि तो सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे सादर केला, त्यांनी चित्रपटाला ए प्रमाणपत्र दिले. आम्हाला माहित आहे की आमचा सिनेमा फक्त 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी आहे, म्हणून आम्ही सहमत झालो.